
बांधकामाची उच्च गुणवत्ता, नावीन्यपूर्ण कल्पना आणि व्यवसायाप्रतीची प्रामाणिकता याच्या जोरावर ‘रेन्बो हाऊसिंग’ च्या माध्यमातून सुनील नहार यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या कामातील वेगळेपणाची आणि कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’ या नामांकित व्यापारी संघटनेकडून व्यापारमहर्षी स्वर्गीय उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला. रेन्बो हाउसिंगचे संस्थापक आणि प्रमुख असलेले सुनील नहार यांना हा पुरस्कार आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्याचे बंधू सचिन नहार उपस्थित होते.
नहार हे कुटुंब मूळचे राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील. सुमारे १९२३ मध्ये सुनील नहार यांचे आजोबा गिरीधर नहार हे पुण्यातील बहुळ गावी आले. आजी छोटीबाई नहार यांनी चांगले संस्कार देत घराला घरपण आणले. सुनील नहार यांच्या वडिलांचे नाव पोपटलाल नहार तर आई चंद्रकलाबाई. आजी- आजोबांनी सुसंस्कार देत भाऊ सचिन नहार, बहिणी साधना रांका आणि स्मिता कांकरिया यांना घडवले. शेती व्यवसाय करताना वडील पोपटलाल यांनी प्रामाणिकता आणि श्रमप्रतिष्ठेला नेहमीच प्राधान्य दिले आणि तोच वारसा आम्ही दोघे भावंडे आमच्या व्यवसायात तितक्याच प्रामाणिकतेने सांभाळत आहोत, असे सुनील नहार सांगतात.
सुनील नहार यांचा जन्म २७ डिसेंबर १९६८ रोजी पुण्यातील बहुळ या गावात झाला. त्यांचे बालपण हे बहुळ या गावातच गेले. पुढे १९९२ मध्ये त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या कौशल्याच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
सुनील नहार यांनी आपली सुरुवातीची वर्षे बहुळमध्ये घालविली. त्यानंतर त्यांनी रेन्बो हाउसिंगची स्थापना केली. उच्च दर्जाच्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पाच्या विकासासाठी रेन्बो हाउसिंग काम करू लागले.
या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट उच्च गुणवत्ता, टिकाऊपणा आणि ग्राहकांचे समाधान असल्याचे सुनील नहार म्हणतात. स्थापनेनंतर त्यांनी अनेक यशस्वी प्रकल्प राबवले. ते म्हणतात, आज बांधकाम क्षेत्राला पर्यावरणा अनुकूल घटकांचा विचार करणे गरजेचे झाले आहे. बांधकामादरम्यान जास्तीत जास्त पर्यावरणाअनुकूल घटकांचा वापर करून कमीत कमी कार्बन फूटप्रिंट राहील याची आम्ही काळजी घेतो. साहजिकच आमच्या व्यक्तिगत विकासाबरोबरच व्यावसायिक विकासाला प्रेरणा मिळताना दिसत आहे. इस्टेट, बांधकाम क्षेत्राच्या पलीकडे जाऊन सुनील नहार यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक कामे केली. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे अनेक संस्थांना नवऊर्जा मिळाली.
सुनील नहार यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांना बांधकाम क्षेत्रात नवी दृष्टी देणारी आहे. त्यांच्या कार्यामुळे आणि नेतृत्वामुळे रेन्बो हाउसिंगने उंच भरारी घेतली आहे. अल्पावधीतच आपल्या कामगिरीने त्यांनी नाव कमावले. त्यांच्या कल्पकतेने आणि गुणवत्तेच्या बांधकामाने रेन्बो हाउसिंगला एक विशेष स्थान मिळवून दिले आहे.
1. १९९२ मध्ये प्रीमियर ऑटोमोबाइल्समध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात झाली.
2. १९९४ मध्ये भारती इंजिनीअर्समध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून काम केले.
3. १९९८ मध्ये सुनील यांनी कंत्राटी व्यवसायात प्रवेश केला.
4. २००७ मध्ये पार्क रॉयल आणि रेन्बो प्लाझा या प्रोजेक्टची सुरुवात झाली.
5. २००९ मध्ये त्यांना प्रतिष्ठित कॉन्सिल हॉल पुणे कॉन्ट्रॅक्टिंग प्रकल्प मिळाला.
6. २०१२ मध्ये ‘पेबल्स’ या गृहनिर्माण वसाहतीचा शुभारंभ झाला. या प्रकल्पाचा उद्देश रहिवाशांना शाश्वत राहण्याची जागा देणे हा होता. 7. २०१७ मध्ये प्रोजेक्ट ‘पेबल्स अर्बानिया’ आला. तसेच पुण्यातील विमानतळ येथे असलेल्या एरोमॉल पुणे हा बांधकाम प्रकल्प पूर्ण करून त्यांनी रेन्बोसाठी महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

